महिलांसाठी सर्वोत्तम लघु व्यवसाय कर्ज कोठे शोधावेत?

आजकाल महिला स्वतःचे व्यवसाय चालवण्याइतक्या सक्षम आहेत. गेल्या दोन दशकांत, भारतात स्त्रियांच्या मालकीच्या व्यवसायाची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. ‘महिला शक्ती’ आणि आर्थिक विकासावर वाढते लक्ष आणि आर्थिक विकास यामुळे महिलांना उद्योजक होण्यासाठी भाग पाडले आहे.

सर्व व्यवसाय मालकांना, त्यांच्या उद्यम वाढीसाठी आणि विस्तारासाठी वेळोवेळी आर्थिक मदतीची आवश्यक असते. महिला उद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी आर्थिक व्यवस्था करण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या आव्हानांवर मात करण्याची देखील गरज पडते. संशोधन हे सूचित करते की महिलांना लघु व्यवसायासाठी कर्ज मिळविण्यामध्ये अनेकदा कठोर समस्या येतात. परंतु चांगली बातमी ही आहे की, महिलांना सुरक्षित कर्ज प्राप्त करण्यासाठी, बजाज फिनसर्व्ह सारख्या गैर-बँकिंग वित्तीय निगमां (एनबीएफसी) च्या बरोबर, सरकारचा पुढाकार आणि धोरणे यात वृद्धी झाली आहे.

देशात महिला उद्योजकतांना चालना देण्यासाठी, सरकार आणि एनबीएफसींने परवडणाऱ्या व्याजदरांसह महिलांसाठी विशेष योजना सुरु केल्या आहेत. या खास योजना, संपार्श्विक (दुय्यम) तारणांबरोबरच पेआउट दारांच्या संदर्भात लवचिकता प्रदान करतात.

महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्याकडे अन्य विधीविषयक पर्याय आहेत. महिलांसाठी काही वित्तीय पर्यायांमध्ये खालील काही पर्यायांचा समावेश आहे:

गैरबँकिंग वित्तीय निगम (एनबीएफसी)

बजाज फिनसर्व्ह सारख्या एनबीएफसी, महिलांना अल्प व्याज दराने लघु आणि दीर्घ मुदतीसाठीचे कर्ज देऊ करत आहेत. या कर्जांना कर्ज लवचिक पेआउट पर्यायांची सुविधा आहे.  साधारणपणे, हे कर्जे तारणमुक्त असतात. एनबीएफसी महिला उद्योजकांसाठी अनेक विशेष योजना आखत आहे. साधारणपणे, व्याज दर कमी असतात किंवा या विशिष्ट व्यवसायिक कार्जांसाठी कर्जाचा कालावधी उच्च असतो.

ऑनलाइन ऍप्लिकेशन सारख्या सुविधासह, एनबीएफसीकडे व्यवसायाच्या कर्जासाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. कर्जाची मंजुरीही अतिशय जलद आहे आणि व्यावसायिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे फार कमी आहेत.

विशेष सरकारी योजना

महिला उद्योजकतांना चालना देण्यासाठी, केवळ महिलांसाठीच सरकारने विस्तृत योजनांची निर्मिती केली आहे. याद्वारे महिलांना कमी व्याज दरासह  विविध पर्याय प्रदान केले जातात. त्यातील काही पर्याय आहेत:

  • अन्नपूर्णा योजना
  • श्रीशक्ती पॅकेज
  • भारतीयमहिला बँक
  • सेंट कल्याणीयोजना
  • मुद्रायोजना
  • महिलाविकास योजना

बँका

एक ठराविक कालावधीसाठी, बँका नियमित व्याजदराने मुदत कर्ज देतात. बँकांचे दंड आकारण्याचे कडक निकष आहेत आणि एनबीएफसीच्या तुलनेत, कर्ज प्राप्त करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.  तसेच, बहुतेक बँका लहान व्यवसायांसाठी कर्जाची प्रक्रिया करण्याआधी संपार्श्विक मागतात जे लहान व्यवसायासाठी मोठे काम असू शकते.  ते कर्जाची रक्कम आणि व्याज दर निश्चित करण्यासाठी क्रेडिट स्कोअरची जवळून चौकशी करतात.

जमाव निधी (क्राउड फंडिंग)

लहान व्यवसायांसाठी निधी निर्माण करण्याचा जमाव निधी (क्राउड फंडिंग) अजून एक मार्ग आहे. प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने लोक, पैशाच्या छोट्या रकमेचा निधी पुरवू शकतात.  या पर्यायी वित्तपुरवठा पर्यायामुळे, संपत्ती गोळा करण्यासाठी वेळ लागू शकतो.

महिला उद्योजकांना कर्ज मिळण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एक विशिष्ट फायदा आहे. एनबीएफसी, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील बँका, सरकारच्या सोबत, महिलांच्या मालकीच्या व्यवसायासाठी कर्ज पुरवण्यासाठी खास योजना आखत आहेत, त्यामुळे महिला उद्योजकांना त्यांचे स्वप्न साकारण्यात मदत होते.

Comments

comments