थियेस्सनक्रपतर्फे पुण्यात वी सायकल अँड वी वॉक चे आयोजन

0
1158

पुणे. : आरोग्य, सुरक्षितता आणि शाश्वतता हे प्रमुख घटक म्हणजे थियेस्सनक्रपचे कॉर्पोरेट धोरण आहे. शुक्रवारी, थियेस्सनक्रपचे तब्बल 700 कर्मचारी, वी सायकल अँड वी वॉक या उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात सायकल चालवत आणि चालवत ऑफिसला गेले, पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरुकता पसरवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.

300 कर्मचारी 12 किलोमीटरपर्यंत सायकल चालवत आणि 400 कर्मचारी तीन किलोमीटरपर्यंत चालत ऑफिसला गेले, यामध्ये थियेस्सनक्रप इंडस्ट्रीज इंडियाचे एमडी आणि सीईओ मलाय दास आणि थियेस्सनक्रप इंडस्ट्रीज इंडियाचे सीएफओ  जी. व्ही. केतकर यांचाही समावेश होता.

कंपनीच्या आवारात कार किंवा बाईक्सना प्रवेश नव्हता आणि कर्मचाऱ्यांना सायकल किंवा सार्वजनिक वाहनांनी ऑफिसला ये-जा करायची होती; सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनही पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते.

“थियेस्सनक्रपच्या शाश्वत प्रयत्नांसाठी पर्यावरणीय संरक्षण हा प्रमुख घटक आहे. ऑफिसपर्यंत चालत येणे हे आरोग्यासाठी चांगले आहेच, शिवाय आपले जीवनमानही सुधारते, आणि याव्यतिरिक्तचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने, पर्यावरणाला याचा लाभ होतो,” असे थियेस्सनक्रप इंडस्ट्रिज इंडियाचे एमडी आणि सीईओ मलाय दास म्हणाले.

प्रदूषण आणि पर्यावरणाचा वाढता धोका हा समकालीन सिनारिओतील प्रमुख घटक आहे. स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाच्या खात्रीसाठी महत्त्वाची पाऊले टाकण्यात आली आहेत.

थियेस्सनक्रप हा वैविध्य असलेला औद्योगिक ग्रूप आहे, त्याच्या भारतातील प्रवासाला 1860 साली सुरुवात झाली. एशिया-पॅसिफिकमधील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकावरील बाजारपेठ असलेल्या आमच्या कंपनीकडे 7000 कर्मचारी आणि दहापेक्षा जास्त प्रक्रियांची युनिट्स आहेत. पूर्ण प्लांटची रचना आणि इंजिनिअरिंग यातील औद्योगिक प्लांट, समुद्री यंत्रणा आणि एलिव्हेटर्स आदींची आमच्या उत्पादनांच्या आणि सेवांची श्रेणी इंजिन घटक, बेअरिंग आणि साहित्याच्या सेवांची हाताळणी यासाठी सादर केली गेली आहे. आम्ही जागतिक स्तरावरील इंजिनिअरिंग तज्ज्ञतेचा लाभ घेऊन आमच्या जागतिक नेटवर्कअंतर्गत आमच्या ग्राहकांना स्पर्धात्मक उत्पादने देत आहोत.

Please follow and like us:

Comments

comments